दि. १३ जानेवारी २०२६ रोजी महिला विकास कक्ष, भारतीय उद्योजकता विकास संस्था, रत्नागिरी व जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी "उद्योजकता विकास व महिलांसाठी उद्योजकीय संधी" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी श्री. विनय चव्हाण ( प्रकल्प अधिकारी) भारतीय उद्योजकता विकास संस्था, रत्नागिरी व श्री. आकाश म्हेत्रे (उद्योग निरीक्षक) जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी. हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्र. प्राचार्या मधुरा पाटील, वाणिज्य शाखाप्रमुख सहा. प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखा प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर, महिला विकास कक्ष प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर, इतर प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.