देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात दिनांक २९ जुलै २०२५ रोजी परीक्षा विभागामार्फत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ले. कर्नल प्रशांत चतुर (निवृत्त), उपनियंत्रक, गृह विभाग, नागरी संरक्षण दल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विषयांत प्रथम येणाऱ्यांना विशेष पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. 1. प्रा. एन. वाय. कुलकर्णी पारितोषिक – कु. दिव्या निळे (मराठी), 2. प्रा. शालिनी मेनन पारितोषिक – कु. ऋतिक गुरव (अर्थशास्त्र), आणि 3. प्रा. हरिप्रसाद लड्डा पारितोषिक – कु. सिद्धी पवार (अकाउंट) यांना प्रदान करण्यात आले.