दि. १७ जानेवारी २०२६ रोजी 'मराठी भाषा: जतन संवर्धन' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून जयश्री संजीव बर्वे (सेवानिवृत्त अध्यापिका, कवयित्री) या उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, विज्ञान शाखा प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर, वाणिज्य शाखा प्रमुख सहा. प्रा. राखी साळगावकर, मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. समिक्षा पालशेतकर, अन्य प्राध्यापकवर्ग आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.