दि. २१ फेब्रूवारी२०२६ रोजी महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, IQAC (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) आणि मॅजेस्टिक फ्युचर हब इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठ चे सांस्कृतिक विभाग समन्वयक श्री. निलेश सावे, कणकवली कॉलेज युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. आशिष नाईक, राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा सुवर्णपदक विजेते श्री. विवेक वारभुवन आणि प्रसिद्ध अभिनेते श्री. निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या सहा.प्रा. वसुंधरा जाधव , IQAC समन्वयक सहा.प्रा.राखी साळगावकर , विज्ञान विभाग प्रमुख सहा. प्रा. घाणेकर सर तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा.प्रा ऋतुजा भोवड उपस्थित होते.