आजीवन अध्ययन विस्तार विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. कौस्तुभ महेश सरदेसाई उपस्थित होते. त्यांनी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर, वाणिज्य विभाग प्रमुख सहा. प्रा. राखी जाधव, तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.