दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा विधी प्राधिकरण रत्नागिरी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. या सोबतच विधी साक्षरता शिबिर ही संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव मा. आर.आर. पाटील सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्र.प्राचार्या सौ. मधुरा पाटील, कला विभागप्रमुख सहा.प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखा प्रमुख सहा. प्रा. राखी साळगावकर तसेच अन्य प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.