+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
January 2026 - News & Events
उडान फेस्टिवल 2026 मध्ये महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या वतीने आयोजित उडान फेस्टिवल 2026 मध्ये महाविद्यालयाने चार विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले.
1) सृजनशील लेखन स्पर्धेत ईश्वरी पवार- गोल्ड मेडल
2) पोस्टर मेकिंग स्पर्धेत साईश्वरी दशवंतराव रचना तेरवनकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त
3) पथनाट्य संघ-ब्रॉन्झ मेडल

दि. ३० जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा या विषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुभाष मायंगडे (आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय) उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला विभागाच्या विभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. राखी जाधव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग प्रमुख प्रा. हर्षदा लिंगायत यांसोबत इतर प्राध्यापक उपस्थित होते.
दि.२८ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांची पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि इतिहास विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुर्मिळ ऐतिहासिक पुराभिलेखाच्या प्रदर्शनास भेट

दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयामधील समाजशास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामाजिक संशोधन ' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाकरिता प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत तानाजी नारगुडे (आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय) उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमाच्या अंतर्गत दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी नारळ संशोधन केंद्र भाट्ये येथील अपिकल्चर (मधमाशी पालन) युनिटला भेट दिली.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे २५ जानेवारी २०२६ रोजी 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रत्नागिरी बसस्थानक परिसरात स्वयंसेवकांनी प्रभावी पथनाट्य सादर करून प्रवाशांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
महाविद्यालयामध्येही या दिनाचे औचित्य साधून सहा. प्रा. स्मार्था कीर यांनी उपस्थित सर्वांना 'मतदार प्रतिज्ञा' दिली. "आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू..." अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपला लोकशाही अधिकार बजावण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, विज्ञान विभाग प्रमुख वैभव घाणेकर , राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सहा. प्रा.मिथिला वाडेकर आणि इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दिनांक.२४ जानेवारी २०२६ रोजी आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धांमधील यश पुढीलप्रमाणे:
प्रश्नमंजुषा स्पर्धा : प्रथम क्रमांक – कु. गौरवी ओळकर (SY.B.Com)
पीपीटी सादरीकरण स्पर्धा : तृतीय क्रमांक – कु. संगीता कांबळे (FY.B.Sc) व आर्यन वाघधरे (TY.B.Sc)
पोस्टर सादरीकरण स्पर्धा : तृतीय क्रमांक – कु. महेश्वरी नांदगावकर (SY.BA)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सहा. प्रा. आसावरी मयेकर व सहाय्यक प्राध्यापक ऋतुजा भोवड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri