+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
March 2026 - News & Events
रत्नागिरी नगरपरिषद यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ जनजागृती स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ २४ मार्च २०२६ रोजी नगरपरिषदचे संत गाडगे महाराज सभागृह येथे संपन्न झाला.
या मध्ये भारत शिक्षण मंडळाचे देव - घैसास - कीर कला,वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी मधील कु. गंधर्व बेलवकर याला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक तर निबंध स्पर्धेमध्ये कु. नेहा गोसावी हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच निबंध स्पर्धेमध्ये कु. सानिका खरडे द्वितीय क्रमांक व कु. सौमित्र जोशी आणि कु. सोनिया शुक्ला ह्यांना विभागून तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच महाविद्यालयातील एन. एस. एस. एस. विभाग प्रमुख सहा.प्रा. मिथिला वाडेकर यांना पर्यावरण दूत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

दि. २२ मार्च २०२६ रोजी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु. गौरवी मंदार ओळकर हिचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक आला. तसेच महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका स्मार्था कीर यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

दि.१७ मार्च २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे पर्यावरणशास्त्र विभागाकडून "Environmental Vision: Integrative Academia-Industry Dialogue" नामक एकदिवसीय विनामूल्य कार्यशाळा आयोजित केली होती.महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष व द्वितीय वर्ष विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यां व सहा प्रा.आसावरी मयेकर आणि सहा.सानिका कीर सहभागी झाले होते.

दि. १६ मार्च २०२६ : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांच्यामध्ये शैक्षणिक, संशोधनात्मक व सहशैक्षणिक उपक्रमांच्या देवाणघेवाणीसाठी तीन वर्षांच्या कालावधीचा सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारावर देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा मकरंद पाटील तसेच श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य . डॉ. आशिष घनश्याम बर्वे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उप प्राचार्या व सामंज्यस्य करार विभागाच्या प्रमुख सहा.प्रा. वसुंधरा जाधव तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक सहा. प्रा. राखी जाधव उपस्थित होत्या.
महाविद्यालयात महिला विकास कक्ष व आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०५ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपप्राचार्या सहा प्रा. वसुंधरा जाधव, महिला विकास कक्ष प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर, सर्व शाखांचे प्रमुख, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri